शोध सुखाचा...
माणसे नेहमी सुखाच्या शोधत असतात. आपल्याला आनंद कुठे मिळेल हे पाहात असतात. काहींना भौतिक आणि ऐहिक सुखे हवी असतात. काहींचे हे मिळूनही समाधान होत नाही. त्यांना मानसिक, भावनिक, वैचारिक आनंद देणारे काहीतरी हवे असते. अशा आनंदासाठी स्वतःच लेखक, कवी, कलावंत असण्याची गरज नसते. निर्मितीपेक्षा निर्मितीचा आस्वाद त्यांच्या आयुष्यात आनंदाची झुळूक बनून येतो. मग ते लिहित नसले तरी वाचतात, गात नसले तरी ऐकतात, काही सादर करीत नसले तरी पाहतात. या आपल्या अवतीभवतीच्या माणसांनी त्यांच्या त्यांच्यापुरते एक सुखाचे तळे शोधलेले असते. त्या तळ्याकाठी ते मग्न होतात. नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, क्रीडा, व्याख्याने, रांगोळी, आकाशदिवे, कुणाला गुपचूप आर्थिक मदत, कुठे श्रमसेवा अशा अनेक गोष्टी त्यांना सुखावतात. अर्थात, मनोमन!
- वासंती साटम
0 comments:
Post a Comment