काहीतरी

काहीतरी
खुपदा आपण काहीतरी ठरवत असतो. 
हे अस करायचं, ते तस करायचं. 
हे केल्याने अस होईल, ते केल्याने तसं होईल. 
खूप साऱ्या गोष्टींवरती आपण विचार करत असतो. 
दिवस रात्र एक करत असतो. 
ते सगळ आपण स्वतःलाच पटवून देत असतो. 
आणि मग जे आपल्याला पटलंय ते आपण सर्वांसमोर मांडत असतो.
परंतु अशा वेळेला जे काही आपण मांडतोय ते फक्त आपलंच असतं. 
त्यामुळे त्या गोष्टीशी किंवा त्या विचाराशी संगनमत न होणारे खूप जन त्यातल्या चुका काढतात. 
आपण मात्र आपल्या कल्पनेवर ठाम असल्याने इतरांच्या बोलण्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही.
आपण त्याच विचारला पुढे ठेवून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नात असतो. 
आणि त्यामुळे आपल्याला आपल्याच विचाराची काही मानस पण सापडत जातात.
काही समविचारी स्वतःचे काही मुद्दे त्या विचारात घालून त्याला अजून व्यापक बनवतात. 
आपल्या विचाराची गाडी स्वतःहून पुढे हाकू लागतात. 
त्यावेळेस आपला विचार त्यांच्यात सुद्धा विभागाला जातो.
अशा वेळेला मात्र आपण घाबरू लागतो. 
स्वतः मागे राहू म्हणून आपण त्यांना थोपवू लागतो. 
त्यांना चुकीचे ठरवू लागतो. 
फक्त स्वतःच्या नावासाठी स्वतःच्याच कल्पनेला वेगळीच दिशा देवू लागतो.
मात्र त्यावेळेला आपण आपल्या विरोधकांना विसरलेलो असतो. 
आणि ते या गोष्टीचा फायदा घेवून तुमच्याच विचारांनी पुढे जात असतात
फक्त स्वतःच्या 'प्रसिद्धी' खातर आपण आपल्याच कल्पनेची राखरांगोळी करत असतो.
शेवटी डोक आपण खाजवत असतो.
काहीतरी ठरवत असतो.

feeling काहीतरी.


0 comments: