माझं 2013 चं बेस्ट गिफ्ट


Spruha Joshi - Anita Date

0 comments:

bye bye bye 2013...

Aapla Sagla Same Aahe 2014

नमस्कार ../\.. शुभ सकाळ,
आज २०१३ मधला शेवटचा दिवस, खर तर सुरुवातीचा अस म्हटल तरी वावग ठरणार नाही कारण २०१३ चा सुरुवातीला आपण जे जे संकल्प केले आणि अर्धवट सोडले अशे संकल्प आज पासून सुरु करावेशे वाटत असतील सगळ्यांना  असो..... २०१३ माझासाठी खूप खास होत....अर्थात तुम्चासाठीही असेल परंतु या वर्षात काही गोष्टी अधुऱ्या राहिल्या असतील पण त्या आजच्या दिवसात करण शक्य असेल तर नक्की करा....त्या पूर्ण होतील अशा शुभेच्छा.... या वर्षात काही चुकल असेल तर हक्काने माफी मागा , काही आनंदक्षण असतील तर ते सगळ्यांसोबत share करा आणि सगळ्यांना आनंदी करा... मला तर खूप जणांना खूप काही सांगायचं आहे....  बाकी तुमचा २०१३ मधल्या खूप खास आठवणी असतील तर त्या इकडे आम्हालापण कळूदे.....!!! 
(आज रात्री सगळे व्यस्त असतील पण फक्त ५ मिनिट साठी येउन आपली पोस्त बघा आणि कॉम्मेंत करा कारण मला माझा नवीन वर्षाची सुरुवात तुम्चासोबत करायची आहे.)


Durga Vanjare

0 comments:

EPISODE REVIEW 28TH DEC'13

Eka Lagnachi Tisari Goshta


गाडी बंद पडली होती ना तुझी?
चावी देतेय ना?
पेट्रोल भरलं होतस ना?
सर्व्हिसिंग ला देतेस ना गाडी व्यवस्थित?
किक मारूं बघितल होतस ना?
चोक दिला?
ईशाच आकंडतांडव आणि ओमची संयमी संभाषणे....
- अगस्ति देसाई
*************************

Chhan episode hota rav!!!
Khup diwasanni ek serious episode!!
- चैतन्य साठे
*************************

Gurula GURUDAKSHINA mhanun, Tambya-Bhandyacha programme.... :-D :-D
- खेताली तळेकर

0 comments:

EPISODE REVIEW 24th Dec'13

Eka Lagnachi Tisari Goshta


जयू म्हणतो धना धना, पण धना म्हणते ना ना,
अशाने काय घंटा पाळणा हलणार घरात?
- आकाश पाटील
**********************

Aajcha episode out standing hota (rojach astat) bt aaj Ishala patavun detana saglyanche tare firlele  manal raav... n ata suru zali khari gosht.. pahili gosht mhanje isha n om ch prem dusari mhanje hech om swapn... n tisari chi vat paha tevdha suspence mala palavach lagel...
- दुर्गा वंजारे
**********************

Datta bhau ani kake discuss kartaet ani jayesh la kahi vicharlyavar to nusti gani gattoy...
- अगस्ति देसाई

0 comments:

EPISODE REVIEW 21st DEC'13

Eka Lagnachi Tisari Goshta

वाह काय episode होता मित्रांनो आजचा !!! इतकी class हास्यनिर्मिती एखाद्या dailysoap ने करणे तसे कालबाह्यचं झाले आहे. पण ELTG ने ही किमया घडवून आणली आहे. ओमचा मधु आणि धनाबरोबर चाललेला sync dance खूप मजेशीर होता. आजचा मोहन जोशी सरांचा entry scene पाहून त्यांच्या कुर्यात सदा tingalam या नाटकाची आठवण आली. त्यांनी पुन्हा एकदा ELTG chya audience ना आपल्या अचूक कॉमिक timing ची treat दिली. उद्याच्या episodeची झलक पाहून सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार यात काही शंका नाही.
- निलेश बोऱ्हाडे
******************************

Kay episode hota rav!!! Ek number....
Pot dukhu lagla aaj mazha hasun hasun...
Ata fakta udyqchi vaat baghaychi aahe...!!
Udya eltg cha vegala turn ghenara episode asel asa vattay!!!

Feeling- EXITED!!!!
- चैतन्य साठे
******************************

जवळपास रोजच 'आजचा एपिसोड छान होता' अशी पोस्ट केली जाते. एवढी दाद मिळणारी ही एकमेव मालिका असावी.. ही मालिका रटाळ होणार नाही याची खात्री आहे. ईशा ओमच्या घरी लग्न होऊन आल्यावर त्या घरातील नात्यामधे होणारे बदल अशी थीम होती. मनात असा विचार येतो की ओम-ईशाच लग्न तर आहेच, जयेश- धनाच लग्न झालय पण प्रमिला आजी- कामत आजोबा, दत्ता भाऊ- शोभना मावशी ही लग्न(एका एपिसोड मधे उरकली तरी चालतील) बघायला मिळाली तर?????????? नाहीतरी एकाच मालिकेत ती रटाळ न होता ४ लग्न बघण्याचा दुग्ध शर्करा योग एरव्ही कधी मिळेल अस वाटत नाही..
- खेताली तळेकर

0 comments:

विश्वास

Eka Lagnachi Tisari Goshta

मोठमोठे लेखक, विचारवंत, कवी किंवा कोणतीही अनुभवी व्यक्ती जेंव्हा प्रेम या गोष्टीबद्दल आपले विचार मांडत असतात, तेंव्हा ते त्यांच्या बोलण्यात प्रकर्षाने एका गोष्टीवर जास्त भर देतात ते म्हणजे 'नात्यांतला विश्वास'.
एखाद स्वच्छ, सुंदर, नितळ नातं जपण्यासाठी पहिल्यांदा त्या दोन व्यक्तीं चा एकमेकांवर पुर्ण विश्वास असणं गरजेच आहे. कारण एखादी चुकीची कृती सुद्धा काहीवेळा आपल्या नात्याला मारक ठरू शकते. त्यामुळे आपल्या व्यक्ती आणि तिच्यावरचा विश्वास मिळवण, विश्वास जपणं हे त्यावर प्रेम करण्या इतकचं महत्वाच आहे.
पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. खूप वेळा त्यांच्याशी खोट बोलतो, पाहिलं खोट लपविण्यासाठी अजून एखाद खोट बोलतो, मग त्या खोट्या गोष्टीची link इतकं मोठ स्वरूप धारण करते कि त्यानंतर आपण किती हि आदळ-आपट करून खर सांगायचा प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात ती सल कायम राहते.
कित्येक वेळा फक्त गैरसमजुतीतून सुद्धा असा तिढा निर्माण होतो, आणि ज्याची काहीच गरज नव्हती असे विषय सुद्धा त्यात आपल्या माथ्यावर येतात,
पळवाट काढणे हा तर विश्वास तोडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग अस मला वाटत, कारण आपण एखाद्या गोष्टीपासून पळ काढत आहोत हे समोरच्या व्यक्तीला कळायला आजच्या generation मध्ये तरी जास्त वेळ लागताच नाही, आणि एकदा का शंकेची पाल चुकचुकली कि मग ती सगळ गिळंकृत केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस आपल्या बद्दल कोणीही काहीही सांगितलेल्या गोष्टी नात्यां मद्धे फुट पाडू शकतात. तेंव्हा योग्य आणि अयोग्य अस काहीच नसत, पण क्षणाक्षणाला द्वेष मात्र वाढत जातो.
ह्या सगळ्या पेक्षा आधीच सगळं clear केलेलं काय वाईट. 
काय असेल ते सरळ सांगा, खर सांगा,
खर सांगायला घाबरायचं कशाला?? 
हा त्यावेळेस व्यक्तीला वाईट वाटेल, चिडचिड होईल,
मात्र ते फक्त त्या वेळेसाठीच असेल, आणि थोडं समजावलं कि झाल,
पण उगाच आपला इगो बाळगून जर त्या नात्यातला गोडवा टिकेल अस वाटत असेल तर ते चुकीच ठरू शकत.
थोडा संवाद, थोड प्रेम, थोडी कुरबुर आणि थोडी मस्ती हे साध सोप गणित असत सुखी राहण्याचं.
जितका एकमेकांवर विश्वास वाढेल तितक ते नात दृढ होत जाईल,

बस्स !!

बाकी काय ,

आपल सगळंच सेम हाय...
- आकाश पाटील

Image Credits: Zee Marathi
Tags: Eka Lagnachi Tisari Goshta, Zee Marathi, Trust, Aakash Patil

2 comments:

500 Members Completed

Eka Lagnachi Tisari Goshta 500 Members


नमस्कार ../\.. शुभ सकाळ....

आज सर्व admins खूप खुश आहेत कारण आपल्या कुटुंबात आता ५००+ सदस्य झाले आहेत, सगळ्याचं मनपूर्वक अभिनंदन...!!! ह्या खडीसाखरेपेक्षाही मधुर क्षणाची मानकरी आहे प्राजक्ता मयेकर.
कारण प्राजक्ता आहे आपली ५०० वी सदस्य ....!!!
तुझ खूप खूप स्वागत  ../\..
खरतर हे २ दिवसात करणं सगळ्यांनाच सहज शक्य होत पण कुटुंबात कोणालाही जबरदस्ती सहभागी करता येत नाही त्यासाठी मनाला स्वतःहून आपलेपणा वाटावा लागतो  आज आपल्या कुटुंबाला २ महिने आणि काही दिवस झाले आहेत पण एवढ्या दिवसात हळू हळू का होईना आम्ही तुमाचासारखी लाखमोलाची माणस कमावली आहेत आणि यापुढेही कमवत राहू आणि नाती जपत राहू.... जर या कालावधीत कोणाला काही त्रास झाला असेल तर मनापासून sorry, आणि सगळ्यांना thank you सुद्धा.... तुमाचासाठीही हि नक्कीच आनंदाची बाब असेल ना....??? 

Durga Vanjare

0 comments:

सहवास

सहवासकस असत ना!!!!
आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो,
तिच्या सहवासात वावरतो,
त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो,
पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते,
आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत,
कारण...
आपल्याला त्या व्यक्तीची सवय झालेली असते,
तिच्या सहवासात राहण्याची
आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते,
तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत.. 
आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो
एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच.....


- कस्तूरी डोके


Tags: Alone, Love, Kasturi Doke

0 comments:

EPISODE REVIEW 13TH DEC'13

Eka Lagnachi Tisari Goshta


खरच इतर गोष्टींप्रमाणे प्रेम सुद्धा दिल्याने वाढत...
आपण समोरच्याला जेवढ प्रेम देऊ तेवढच प्रेम तोही आपल्यावर करेल ...
आणि एकमेकांच्या जवळ असतानाहीं ..
एकमेकांना समजून घेतल्यानेच प्रेम 'टिकत'..
म्हणजेच नात्यातला 'गोडवा' टिकतो.!!
- चैतन्य साठे
*******************************

अनमोल असचं प्रञ,
आजच्या तरूणाईला आयुष्य कसे जगावे हा msg दिला मोठ्या बाबा नी...
- कांचन माने

0 comments:

EPISODE REVIEW 12TH DEC'13

Eka Lagnachi Tisari Goshta

आज माझे काही खरे नाही असे वाटले.......
हसून हसून पोटात दुखायची वेळ आली होती......:-):-):-):-)
खूप भारी एपिसोड होता आज 
काय मस्त नाचला ओम.... 
Hahahahahahahahahahaha
Hahahahahahahahahahaha
Hahahahahahahahahahaha
Hahahahahahahahahahaha
- नितेश कदम
**************************


काय राव काय मस्त एपिसोड होता आजचा......
जाम हसलो मी तर...
आणि काय उखाणे घेतले दोघांनी....
लक्षात असते तर लिहिलेही असते...
पण काही वेळी गोष्टी लक्शात ठेवण्या पेक्षा त्यावेळी त्या enjoy करण
जास्ती महत्त्वाच असत....
- चैतन्य साठे
**************************

कसला भारी एपिसोड होता ना... खरच खूप मस्त. मी तर खूप हसले आज... आणि आज माझे दाद सुद्धा खूप असले आजचा एपिसोड बघताना..
n its huge thing for me... love him lots..
केळीचं पान टर टर फाटतंय,
इशाच नाव घेताना चुरू चुरू वाटतंय..
इशा चा थोडा डिफिकल्ट होता ना...
पण आठवेल तेव्हा पोस्ट करेन मी पक्का..
- दुर्गा वंजारे
**************************

" स्वंयपाक घरातील फडताळात, ठेवले होते फणसाचे गरे...
ओमराव आमचे दिसतात बरे, पण वागतील तर खरे... "
मस्तच होता इशा चा उखाणा !!!
- स्नेहल वाघ

0 comments:

वाढदिवस अभिष्टचिंतन !!!
0 comments:

Episode Review 10th Dec'13

Eka Lagnachi Tisari Goshta


Whatt A Suppperrr X-Ray.... :D :P
अतिशय सुंदर :D

इंजेक्षन पाहून इशा ला आले वेड्यासारखे हसू... डॉक्टर हैराण... :D
ओम डॉक्टर ला पाहून... :/
ओम : मी नवीन आहे... :D
Suppppppppeeeeerrrrrr Episode.... :D :)
- कार्तिक गव्हाळे
**************************

कधिकधी काहीतरी चांगल घडत असेल तर थोडस खोट बोल्लेल चालत....
....पण हे तू लक्षात ठेवशील नां.....
बिच्चारा ओम..
- चैतन्य साठे

1 comments:

स्पृहा ताई आणि उमेश दादा कडून शुभेच्छा !

Set Bhet
0 comments:

सेट भेट !

Eka Lagnachi Tisari Goshta

Eka Lagnachi Tisari Goshta

Eka Lagnachi Tisari Goshta

Eka Lagnachi Tisari GoshtaEka Lagnachi Tisari Goshta


Eka Lagnachi Tisari Goshta


Eka Lagnachi Tisari Goshta

Eka Lagnachi Tisari Goshta


Eka Lagnachi Tisari Goshta

Eka Lagnachi Tisari Goshta


Eka Lagnachi Tisari Goshta


Eka Lagnachi Tisari GoshtaUmesh Kamat


Eka Lagnachi Tisari Goshta

Eka Lagnachi Tisari GoshtaEka Lagnachi Tisari Goshta

1 comments: