बायोस्कोप

Spruha Joshi in Bioscope

Came together by the liking of poetry, Four acclaimed directors Viju mane, Ravi Jadhav, Gajendra Ahire, Girish mohite have tried their skills on a novel concept. Bioscope film based on poetry, Poetries of Saumitra, Sandip Khare, Yashwant Loknath, Mirza Galib painted on a 70mm canvas is a definite visual treat.
Golden tree entertainment pvt. Ltd. presenting a super different stuff, never ever tested “Magic of Four”.

Bioscope Marathi Movie


The trend of anthology films seems to have caught up with Marathi cinema as well.

Gajendra Ahire’s ‘Chaudhvin ka Chand’ is based on Mirza Galib’s ghazal Dil-E-Nadaan which has Neena Kulkarni and Suhas Palshikar.

Ravi Jadhav’s ‘Mitra’ is based on poet Sandeep Khare’s poem which is close to Vijay Tendulkar’s story ‘Mitra Chi Goshta’ which has Veena Jamkar and Mrunmayee Deshpande in lead.

Girish Mohite’s ‘Baiil’ is based on poet Lokanath Yashwant’s poem by the same name and has Mangesh Desai and Smita Tambe in lead.

Viju Mane’s ‘Ek Hota Kau’ is based on poet Kishore Kadam’s poem by the same name and has Spruha Joshi and Kushal Badrike in lead.Credits: madaboutmoviez.com, marathistars.com

Tags: bioscopespruha joshiravi jadhavsaumitra

0 comments:

Yellow

Yellow Marathi Movie


"अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू?? सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग? त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ." 
ऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.

अपेक्षा भंग.
आजकाल प्रत्येक व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा, आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो मागत असतो.
काही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.
पण काही जन नाही करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे ते multitasker नसतात. 

पण यामुळे त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.

आपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.

आपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.

जे आहे ते चांगल अस म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला. 

त्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.

सोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.

मुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.

(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )

Yellow या मराठी movie चा trailer पाहून विषय सुचला. तुम्ही पण पाहू शकता

- आकाश पाटील


0 comments:

EPISODE REVIEW 9TH JAN'14

Eka Lagnachi Tisari Goshta

नैराशेच्या तिमिरातून ध्येयाच्या तेजाकडे वाटचाल करण्यासाठी आशेचा तो पहिला किरण ज्याप्रकारे नवीन उम्मेद जागी करतो तसाच उत्साही अविर्भाव ELTGच्या आजच्या episodeने माझ्या पडेल चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याबरोबर मनात आलेला विचार share करण्यासाठी बोटं keyboard कडे वळली. मित्रांनो, तुमच्याप्रमाणे मलाही हा दुरावा आता हळूहळू टोचायला लागला होता, पण आज इशा आणि काकेमध्ये झालेलं एकतर्फी संभाषण नक्कीच आशादायी होतं. कारण आश्विनीला सत्याची जाण होणं हे इशा इतकंच महत्वाचं होतं. ईशाच मन वळवू शकणार्या दोन व्यक्तींपैकी ती एक व्यक्ती !!! आपल्याला ELTG चा हा प्रवाह कितीही संथ वाटला तरी ही कथा मालिकेच्या रुपात मांडताना हे असे phases येणं ही कथाकारापेक्षा (गोडबोलेनपेक्षा) पटकथाकाराचीच (मांडलेकरांची) मागणी जास्त असणं स्वाभाविक आहे. कदाचित अत्यंत प्रेमळ आणि भरवशाच्या नात्यांमध्ये वाढलेली मुलगी विश्वासघात झाल्यामुळे कशी टोकाची भूमिका घेऊ शकते याचं हृदयद्रावक चित्रण करण्याची गरज दिग्दर्शकाला भासली असावी. असे असले तरी, या निमित्ताने स्पृहा आणि उमेश सोबत इतरही कलाकारांच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळाले. ओमच्या मनात आता पुन्हा पण खऱ्या नात्यांचं कुटुंब उभं करण्याची इच्छा निर्माण होईल असा काहीसा धुसर अंदाज बांधायला हरकत नाही आणि परिस्थितीने निर्माण केलेलं हे अंतर आता परिस्थितीच कापेल असा आशावाद बाळगू....काय??? ELTG मध्ये सध्या घडणाऱ्या प्रसंगांमुळे group वर दुःख व्यक्त करणारे posts वाचून एक विचार मांडावासा वाटतो. (I hope की या posts just immediate reactions आहेत.) But still ,शेवटी एक करमणूक म्हणून सादर केल्या जाणाऱ्या या कलाकृतीत भावनिकदृष्ट्या किती गुंतायचं हा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी आपल्यामुळे एखादी व्यक्ती वास्तविक जीवनात इतकी दुखावली जाईल हे स्पृहाला सुद्धा आवडणार नाही !!! So enjoy this art of expressions and emotions...!!!
- निलेश बोऱ्हाडे
*********************************

हल्ली उंदीर या प्राण्या बाबत मराठी माणसाच्या मनात वेगळ स्थान निर्माण झाले आहे... :-)
- गुरु पंचपोर
*********************************

Aaj om kharach practical vatla khup ani isha......tichyabadal fakt evdach bolen...mujhe kuch nahi kehna..mujhe kuch nahi kehna..mujhe kuch nahi kehna ;-) :-P
- अगस्ति देसाई
*********************************

Ommmmm
Ommmmm
Ommmmm
Ommmmm
Manala shant kartoy...
Wadal aaley manat......
Je kahi chalale aahe te patat nahiy aani pahavat hi nahiy.
Ghusmat zaliy. Manat baryach goshti kondun thevlya aahet ase janavtey.
Madhu sobat om ne aapna sarvana hurt keley.
Pan mitrano mala he hi kaltey ki hyaveli om kontya paristhititun jat aahe. Tyat tyacha tari ky dosh mhane..
So aapan sarv (om aani isha)ya condition madhun nakkich lavkar baher yeu.....
- नितेश कदम
*********************************

"प्रत्तेक व्यक्ती आपापली जागेवर बरोबर असते.
एखाद्या क्षणी ती व्यक्ती अशी का वागली हे जाणण्यासाठी
त्या व्यक्तीच्या जागेवर स्वताला ठेवून बघायचे....
- रोशन काटेकर

0 comments:

स्वार्थ

स्वार्थ
साधारणता स्वार्थ म्हटलं कि स्वतःसाठी,स्वतःपुरताच विचार करण्याची आणि जगण्याची भावना असा समज आहे, पण खरच अस आहे का...?
माझ्या मते नाही...
आपण प्रत्येक वेळी कोणा-ना-कोणावर अवलंबून असतो,बाहेर गेल्यावर घरी लवकर जायचं अशी भावना आपल्यासाठी असते कि आई,वडील,भाऊ,बहिण ह्यांचासाठी..? 
जिथे आर्थिक गोष्टींचा संबंध येतो तेव्हाही आपण आपला स्वार्थ पाहतो पण तो फक्त आपल्यासाठीच असतो का..? अर्थात नाही. आपली संस्कृती हि कुटुंबावर विश्वास असलेली संस्कृती आहे त्यामुळे तो स्वार्थ हा सर्वस्वी कुटुम्बासाठीचा असतो... नाण्याला दोन बाजू असतात तर हि मांडलेली बाजू दुसरी बाजू आहे अस समजा स्वार्थी माणस प्रत्येक वेळी आपला फायदा पाहतात पण कोणास ठाऊक पडद्यामागे वेगळीच दुनिया असेल... कोणतेही समाजकार्य स्वार्थाने मिळालेल्या गोष्टींतून घडत नाही हे मान्य आहे पण तेच समाजकार्य करण्यामागे प्रत्येकाचा आपण कितीही नाही म्हटलं तरी स्वार्थच दडलेला असतो. हे समाजकार्य करून आपल्याला पुण्यच मिळणार आहे तर करायला काय हरकत आहे अशी भावना आपण कितीही नाकारलं तरी मनात येतेच.
देवळात लोक देवाकडे नवस मागतात आणि ते मागितलेले असतात म्हणूनच पूर्ण करतात, (देवाचा कामात फसवणूक नको देव आपल्यावरच कोपेल ह्या भावनेने) पण जर आपल्या आयुष्यात न मागताच काही सुंदर मनासारख्या गोष्टी घडल्या तर आपल्या येते का त्यावेळी देवाची आठवण..? तेव्हा आपण देवाला अभिनंदन किंवा आभार व्यक्त करतो का..? प्रत्येक जण स्वतःच आयुष्य एकाच नजरेने बघून जगात असतो पण त्याची दुसरी बाजू कितीहि कटू, खडतर दिसणारी असली पण मार्गावर आल्यावर सुंदर आणि नवीन नवीन विचार करायला लावणारी असते हे आपण लक्षातच घेत नाही.. आयुष्याकडून मागण्यापेक्षा आयुष्याला तुम्ही काहीतरी द्या, ते सार्थकी करा... 
दिवस येईल तसा जगावा हे वाक्य बोलणार्यांना माझे कोटी प्रणाम ../\.. दिवस येईल तसाच जगावा माणसाने पण आलेल्या दिवसाला सुद्धा एक काल आणि उद्या जोडलेले असतात ह्याच भान ठेवाव  
बाकी हम जियेंगे भी आपनी मार्झी से और मरेंगे भी आपनी मर्झी से...

(वरील मांडलेली बाजू हि नाण्याची दुसरी बाजू आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे आणि हे सर्वस्वी माझे विचार आहेत,ज्यांना पटतील त्यांनी घ्या ज्यांना नाही पटणार त्यांनी स्क्रोल करा)

Durga Vanjare

0 comments:

Coffee Solves Everything

Coffee Solves Everything
    इशा आणि अश्विनी यांच्यासारखी मैत्री आपलीही असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. एकत्र मजा करता येते, करता येतात आणि मुख्य म्हणजे आपला डोंगरा एवढा वाटणारा प्रॉब्लेम झटकन सोडवता येतो. अगदी जिवाभावाची अशी ही मैत्री.
    पण कधी कधी मैत्री मधे तणाव निर्माण होतो. त्या वेळेस गोष्टी धीराने घेतल्या नाहीत तर प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. परिणामी मैत्री संपवण्याची वेळ येते. या गोष्टी खरंतर इवल्याशा आहेत. मैत्रीत तणाव निर्माण करणार्या सर्वसाधारण गोष्टी म्हणजे jealousy आणि गैरसमज. गैरसमज हे मैत्रीत फूट पाडणारं सर्वात मोठं कारण.
    आपल्याला समोरच्या व्यक्तीची एखादी गोष्ट खटकते किंवा काही वेळेस मैत्रीत ह्या ना त्या कारणा मुळे दुरावा निर्माण होतो. आणि अशा गोष्टींची जणू यादीच तयार होऊ लागते. सुरवातीस, त्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून आपण काही बोलत नाही, आणि नंतर या गोष्टींची जागा EGO ने घेर ली जाते. " तिने मला दोन दिवस झाले केला नाही, मग मी का करू? ", " मी तर त्याला मेसेज पाठवला होता, त्याचाच आला नाही " किंवा " काल आम्ही बोलत होतो तर तिने मधेच फोन कट केला, ह्याला काही अर्थ आहे का? " असे EGO दर्शक विचार मनात येतात, त्या विचारांना वाटा फुटल्या की मग त्यांना आवरणं अशक्य. अशा वेळेस आपण पुढाकार घेणे केव्हाही उत्तम! त्या व्यक्ती विषयी उगाच तर्क लढवण्या पेक्षा, भेटून, मोकळेपणाने बोलून प्रश्न सुटू शकतात, आणि असं केल्याने मैत्री आणखी घट्ट होते (अनुभव आहे).
     असं म्हणतात ना की बोलण्याने प्रश्न सुटतात, किंवा इंग्रजीत ‘A Cup of Coffee Solves Everything’ तसंच काहीसं.. मैत्रीत काही काळाने दुरावा निर्माण होणारच, त्याला positively घ्यायचं की negatively हे तुमचं तुम्ही ठरवायचं.
     आणखी काय, कॉफी आहेच सोबतीला..


Snehal Wagh

Image Credits: workisnotajob.

0 comments:

पहिली स्नेह भेट !

5 जानेवारी 2014
स्थळ : शिवाजी पार्क, दादर ****************************
© आपलं सगळं सेम आहे!

0 comments:

तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक

Eka Lagnachi Tisari Goshta


"काय ह्या ईशाचे नखरे?? आईवर ओरडायला काय झालाय हिला?? त्या बिचारीला काय माहित?? जर एकांत हवा होता तर घरी यायचंच कशाला?? Change it!! .. दुसरं काहीतरी लाव..,"
- माझे पप्पा (कालचा ELTG चा एपिसोड पाहताना)

खरच आपली generation आहेच थोडी short -tempered. जरा काही मनासारख नाही झालं, कि घ्यायचं घर डोक्यावर, आकांडतांडव करायचा, आपल्याच माणसावर ओरडायचं, हे आता घराघरात चालू आहे. कुणाचा राग आपण कुणावर काढतोय याच सुद्धा भान आजकाल आपण विसरत चाललोय. त्यावेळेला ज्याच्यावर रागावलोय त्या व्यक्तीला तर डोळ्यासमोर येवूच देत नाही, मात्र त्या व्यक्तीशी related इतरांवरही आपण आपला राग दर्शवतो. 
तसं बघायाला गेल तर थोड बोलून, आपापली बाजू मांडून, विचार विनिमय करून जे पण काही वाद किंवा गैरसमज असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आजकाल जो सगळ्यामध्ये ठासून भरलाय असा स्वाभिमानरुपी EGO(!) आपल्याला हे सगळ करू देतंच नाही. त्याच म्हणन असत कि मीच का म्हणून माघार घेवू, मीच का म्हणून सगळ सहन करू, माझ्याच बद्दल अस सगळ का घडतंय आणि इतर ROFL टाईपचे नाना प्रश्न. पण आपल्या EGO मुळे आपली माणस पण दुखावली जात आहेत हे मात्र त्यावेळेस आपण विसरतो.
काहीजानासोबत discussion केल्यावर मला अस लक्षात आल कि, हे सगळ भीतीमुळे पण होत कधीकधी. एका प्रकारची insecurity निर्माण होते मनात आणि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर हक्क गाजवायला लागतो , पण त्यावेळी त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे आपण लक्षात नाही घेत. ती व्यक्ती पण दुखावलेली असेल, त्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा असतील, त्याला पण स्वतःचे काही problems असतील.
जरा विचार करा, तुम्ही एखाद्याला जेंव्हा I Love You म्हणताय, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसह आपल्या हृदयात स्थान देताय, मग तुम्ही त्याची एखादी चूक सुद्धा समजून नाही घेवू शकत?? काय नेमक आहे हे तरी कमीतकमी जाणून घ्या कि राव, अस तडकाफडकी नाती तोडून, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण लाथाडून, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पण वागणार नाही अस त्याच्याशी वागण बर वाटत का?? 
आणि नंतर आपली चूक लक्षात आली कि मग sorry sorry चे msgs करायला परत आपण तयार, म्हणजे व्यक्ती आपल खेळण आहे, जेंव्हा वाटेल तेव्हा छातीशी कावटाळाव नको तेंव्हा फेकून द्याव. हि कसली पद्धत??
प्रत्येकाला स्वतःच स्थान आहे, प्रत्येक जन स्वतःच्या जागी योग्य आणि बरोबर आहे, प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, आहेतच, त्याचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे, पण म्हणून त्याने कसंही वागण योग्य नाही. कारण आपल्याला लोकांमध्येच राहायचं आहे, म्हणून त्यांच्याशी जुळवून घेण सुद्धा आपल कर्तव्य आहे.
nw grow up!! आपण लहान तर नाही न आता. वाद झालेच तर जरा डोक शांत ठेवा, समोरच्याचं ऐकून घ्या. कोणाच ऐकून घेतलं म्हणजे तुम्ही लहान व्हाल अस काही नाही. पण त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटतय ते करा. after all तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक. 

( हा फक्त माझा स्वतःचा विचार आहे. आवडल तर घ्या नाही तर next please करा.)

0 comments:

EPISODE REVIEW 3RD JAN'14

Eka Lagnachi Tisari Goshta


आजचा episode देखील एखाद्या वास्तविक जीवनातील तंटा ज्याप्रमाणे माणसाच्या मनात काहीकाळ का होईना समोरच्या व्यक्तीबद्दल प्रचंड क्रोध निर्माण करून त्या व्यक्तीसाठी मनाचे सर्व दालन बंद करून टाकतो आणि कशाप्रकारे लहान सहान गोष्टी ही त्याच्या अंगाचा तिळपापड करतात याचं क्लेशदायक अनुभव करून देणारा होता. मित्रांनो आपल्या लाडक्या ELTG ला आलेले हे विरहाचे वळण खऱ्या अर्थाने मालिकेच्या नावाला सार्थ करण्याच्या हेतूने आता पुढचे पल्ले गाठणार आहे याचं हे तणावपूर्ण वातावरण संकेत देत आहे बहुधा !!! हीच आहे एका लग्नाची 'तिसरी' गोष्ट !!! मित्रांनो twitter वर दोन दिवसांपूर्वीच या संकेताची चाहूल ELTG च्या एका प्रेक्षकाला लागली होती. हुकुमतसिंग राजपूत नामक प्रेक्षकाने twitter च्या माध्यमाने स्पृहाला या संकेताची विचारणा केली आणि त्याचा अंदाज खरा ठरतोय. By the way, आजच्या अल्प वेळेत play केलेल्या background score ने मला ELDG ची आठवण करून दिली. पुढच्या भागाची झलक पाहता इशाच्या मनावर दाटून आलेले दुःखाचे आणि संतापाचे काळे ढग एवढ्यात तरी सरणार नाहीत अशीच चिन्हे आहेत. मालिकेला आलेले हे वळण आपली उत्कंठा ताणण्यात यशस्वी झाले आहे यात तिळमात्र शंका नाही!!!!
- निलेश बोऱ्हाडे
*************************

Kay yaar!!!yar ata baghavat nahiye!! Kadhi sampanar re he!!radatana baghavat nahi tila ata...!!
- चैतन्य साठे

0 comments:

EPISODE REVIEW 2ND JAN'14

Eka Lagnachi Tisari Goshta

काय मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड? मी पण काय प्रश्न विचारलाय.... हे म्हणजे दाराच्या फटीत बोट अडकलेल्या माणसाला विचारण्यासारख आहे की काय रे बाबा दुखतंय का? सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मला ही तुमच्या इतकच वाईट वाटतंय. पण एक विलक्षण अनुभव आला का तुम्हाला? प्रेक्षकाच्या मनात दुःखाची एक मोठी त्सुनामिरूपी लाट निर्माण करून त्या लाटेच्या गर्तेत आपण झोकले गेलो आहोत असा भास निर्माण करून देणारा कलाकार कोणत्या ताकदीचा असावा? याची तुलना माझ्या मते त्या शब्दफेक आणि कथावर्णन यावर निर्विवाद प्रभुत्व असलेल्या कथाकाराशी करता येईल जो केवळ आपल्या सशक्त वाणीने तत्क्षणी कथेत होणाऱ्या रोमांचीत क्षणांची वातावरण निर्मिती करण्याची अद्भुत कला अंगी बाळगतो. आज पर्यंतच्या स्पृहाने सादर केलेल्या तिच्या अभिनयाच्या विविध छटा पाहता आजचा तिचा अभिनय हा तिच्यामधल्या कलेच्या पूर्णत्वाचा साक्षात्कार घडविणारा होता. स्पृहा जोशी हे नाव येत्या काळात घवघवीत यश आणि लोकप्रेम संपादन केलेल्या कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसेल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. असो, स्पृहाचे गुण गाण्यासाठी आणि आकाशातील तारे मोजण्यासाठी वेळ कधीच पुरणार नाही. येणारे भाग ओमच्या आयुष्यात सुखाचे चार दिवस दाखवणारे असतील आणि परिणामाने आपल्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आणणारे असतील अशी अशा करूया....!!!!
- निलेश बोऱ्हाडे
**************************

Kay challay he!!   kahi suchatach nahiye.  Roj Roj tension vadhatay!! Lavkar sagala nit houde!! The Vadhatach challay year he sagala..
- चैतन्य साठे
**************************

Aajcha episode ne khup ragavlay mala.. Nusta flashbacks madhe ghalavla ani khupach vadavat hote.. Tech tech dakhavat hote ardha taas... Really very very embarrassing :-( :-( :-(
- अगस्ति देसाई

0 comments:

EPISODE REVIEW 1ST JAN'14

Eka Lagnachi Tisari Goshta

Today I'm speechless .... 
Sahsa kadhi me emotional hot nai bt aaj zalele  khupch mast hota episode ani Isha chi acting A1 hoti ani tich je vagan hot tya jagi me aste tar mihi tech kel ast so mala khupch avdlaay aajcha episode 
feeling - dont know 
- दुर्गा वंजारे
*********************

Khupach jasti tension alay! Kay yar.Kay houn basalay he sagala!
Kay honar ata. asa nako vhayla!. Shit yar...
- चैतन्य साठे
*********************

Datta bhau mhanale Sushant la HAT SOD.... Kay jabari hota avaj...
- खेताली तळेकर
*********************

कालचा एपिसोड भयंकर होता.. स्पृहा ताई काय भन्नाट अभिनय करते..
मी तर emotional झाले होते.. असं वाटत होतं की पुढचा भाग पण आत्ताच दाखवावा. होऊदे आजच जे व्हायचं ते.. Zabardast episode...
-Mixed feeling...
- स्नेहल वाघ

1 comments:

नवीन वर्षाचा नवीन संकल्प...

नवीन वर्षाचा नवीन संकल्प

नमस्कार ../\.. नूतन वर्षाभिनंदन ..... 
२०१३ आपल लाडक (काळावर प्रेम केल कि काळही लाडका होतो म्हणून लाडक) वर्ष संपल आणि आता सुरुवात झालीय ती नवीन वर्षाची, त्यासोबतच आपण या वर्षी नवीन संकल्प करून सुरुवात करणार आहोत ती एका नवीन कार्याची   
भाताच्या एका शिताने कोणाचेही पोट भरत नाही पण तेच एका मुठभर तांदळाचा भाताने नक्की भरते  आपणही तसाच काहीस करणार आहोत, आपल्या कुटुंबात प्रत्येक जण सक्रिय आहे... आपण (ज्यांना शक्य आहे ते) या महिन्यापासून आपल्या कुटुंबासाठी काही रक्कम बाजूला सारून ठेवणार आहोत. म्हणजे असे कि प्रत्येक महिन्याला ग्रुप चा नवे ठराविक रक्कम तुम्ही बाजूला सरायची.. आणि दर ६-६ महिन्यांनी ती रक्कम आपण एखाद्या अनाथ आश्रमाला सुपूर्द करायची, आम्ही शक्य तेवढ लवकर बँकेचा पर्याय उपलब्ध करू तोवर ती रक्कम तुमचा जवळच राहील  त्याची इत्यंभूत माहिती आम्ही update करतच राहू. आणि तुमचे पैसे कुठेही वायफळ खर्च होणार नाहीत हि जबाबदारी admin ची असेल 
तर मग तुम्ही सुद्धा मदत करणार ना आपल्या कार्याला..
आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा!!!

Durga Vanjare

Tags: Durga Vanjare, New Year Resolution, Bye Bye 2013, Welcome 2014, Orphanage

1 comments: