Eka lagnachi Teesri Goshta


The story revolves around lovers Om & Isha who want to get married. Isha comes from a closely knit joint family and they are looking for an ideal match for her. When she tells them about Om they agree to the alliance on one condition, “the boy should come from a loving joint family like theirs”.

But as fate would have it all can’t be perfect. Om comes from a broken family. His home is not made up of a typical family comprising of parents, grandparents, brothers & sisters. Instead his home hosts very different, unrelated individuals who are brought together by fate and Om’s generosity.
Will Om & Spruha find a family of their own, will they get the love they deserve? The show is a journey of this beautiful creation.

Featuring an enviable ensemble cast, it marks the return of the endearing Shubha Kote to the small screen along with Spruha Joshi, Umesh Kamat, Mohan Agashe, Mohan Joshi & Shubhangi Gokhale.

This is a daily show and you can watch it Mon - Sat at 9pm on Zee Marathi. We are eager to know your reaction for Eka lagnachi Teesri Goshta.


Credits: India.com (October 16, 2013, 12:06)
Tags: Spruha Joshi, Umesh Kamat, Eka lagnachi Teesri Goshta

0 comments:

प्रेमात पडून बघाच!

Spruha Joshi

स्वतःला खूप कम्फर्टेबल वाटेल असं नात म्हणजे प्रेमाचं नातं. ज्याच्याशी आपण सगळं काही शेअर करु शकतो , ज्याला आपल्या मनातलं आणि आपल्याला ज्याच्या मनातलं काहीही बोलताच कळतं ते खरं प्रेम. जिथे विश्वास आहे , काळजी आहे , असं प्रेम कुणाला नको असतं ? प्रेमात पडल्यावर आपण कोणासाठी तरी खूप स्पेशल आहोत ही भावना खूप काही देऊन जाते. तुझ्यासाठी काहीही करेन , असं आपल्यासाठी म्हणणारं कोणीतरी आहे हे फिलिंग खूप मस्त आहे. कोणतीही अपेक्षा ठेवता आपण आपल्या जोडीदाराला तो जसा आहे तसा स्वीकारणं हे प्रेमात तितकंच महत्त्वाचं आहे.

खरंतर मी फार रोमँटिक नाही. पण , प्रत्येक मुलीमध्ये रोमँटिकनेस थोडा तरी असतोच. आपल्यालाही कुणीतरी ' नी बेंड डाऊन ' पद्धतीने प्रपोज करावं असं वाटतंच. मलाही कुणीतरी फुल टू फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केलेलं आवडेल. मस्त समुद्रकिनाऱ्यावर किंवा एखाद्या क्रूझवर माझ्यासाठी रिंग आणून तो मला प्रपोज करतोय असं मला खूप आवडेल. म्हणजे ' दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' मधल्या प्रपोजलसारखं प्रपोजल मला आलं तर मी सातवे आसमाँपरच असेन. माझी काळजी करणारा , मला समजून घेणारा , माझ्यावर अफाट प्रेम करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास असणारा जोडीदार मला हवाय. तसंच त्याने मला , मी जशी आहे तसं स्वीकारावं. मीही त्याला तो जसा आहे तसंच स्वीकारेन.

प्रेमात पडलं की गिफ्ट्स , सरप्राइजेस , कँडल लाइट डिनर हे सारं ओघाने आलंच. पण , या सगळ्याच्या मुळाशी येते ती म्हणजे ' डेट '. माझी ड्रिम डेट कशी असेल याबद्दलच्या माझ्या कल्पनेला अंतच नाही. तो आणि मी एखाद्या शांत निसर्गरम्य जागी असावं. समोर अथांग समुद्र , साथीला सौम्य संगीत , हातात वाइनचा ग्लास आणि तिथे फक्त मी आणि तो... दुसरं कोणीही नाही. जोडीला मस्त रोमँटिक गप्पा. बास्स.... अजून काय पाहिजे? एकमेकांवर प्रेम करणं जेवढं महत्त्वाचं तेवढंच एकमेकांना वेळ देणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा डेटिंगमुळे आपला ' स्पेशल ' वेळ ' स्पेशल ' व्यक्तीसाठी देतोय हे जोडीदाराला जाणवलं की प्रेमात भर पडलीच म्हणून समजा. त्यामुळे एकमेकांसाठी सहवास हाही महत्त्वाचा आहेच.

सध्या तर प्रेम , विश्वास असे विषय आले की मला रमाबाई आणि महादेवराव रानडे या जोडीशिवाय दुसरी कोणी जोडी दिसतच नाही. माझ्यासाठी ती आदर्श जोडी आहे. त्यांचं नातं इतकं सहज , सुंदर , साधं होतं की त्या सहज नात्याचं मला नेहमी अप्रूप वाटतं. मला महादेवरावांसारखा जोडीदार मिळाला तर मग काय , लाइफ तो सेट है. प्रेमात असलेले सगळे प्रेमवीर ' एकदा तरी प्रेमात पडून बघाच , असं सांगतात ते काही उगीच नाही.

Spruha Joshi

(शब्दांकनः चैताली जोशी)
Credits: Maharshtra Times (February 11, 2013)
Tags: Spruha Joshi, Love, Prem, Ramabai

0 comments:

नाती !

Relatins

सगळ्या प्रकरची नाती...
असतात मुठीत धरलेल्या वाळूसारखी.
मूठ सैलावत हात उघडून धरला तर वाळू राहते जिथल्या तिथे..
मात्रा ज्या क्षणी मूठ मिटून
वाळू धरून ठेवण्यासाठी पकड घट्ट केली,
त्या क्षणी वाळू बोटांच्या फटीतून निसटू लागते.
त्यातली जराशी वाळू उरेलही
पण बरीचशी निसटुनच जाते.
नाती अशीच असतात..
ती सैल सोडली
दुसर्‍या व्यक्तीचा आदर आणि स्वातंत्र्य राखलं
तर ती अबाधित राहतात जशीच्या तशी!
पण ती घट्ट पकडली गेली,
स्वामित्वभावनेनं,
तर ती निसटून जातात आणि कायमची संपतात..


Snehal Wagh

Tags: Sand, Relations, Relation, Snehal Wagh

1 comments: