स्वार्थ

स्वार्थ
साधारणता स्वार्थ म्हटलं कि स्वतःसाठी,स्वतःपुरताच विचार करण्याची आणि जगण्याची भावना असा समज आहे, पण खरच अस आहे का...?
माझ्या मते नाही...
आपण प्रत्येक वेळी कोणा-ना-कोणावर अवलंबून असतो,बाहेर गेल्यावर घरी लवकर जायचं अशी भावना आपल्यासाठी असते कि आई,वडील,भाऊ,बहिण ह्यांचासाठी..? 
जिथे आर्थिक गोष्टींचा संबंध येतो तेव्हाही आपण आपला स्वार्थ पाहतो पण तो फक्त आपल्यासाठीच असतो का..? अर्थात नाही. आपली संस्कृती हि कुटुंबावर विश्वास असलेली संस्कृती आहे त्यामुळे तो स्वार्थ हा सर्वस्वी कुटुम्बासाठीचा असतो... नाण्याला दोन बाजू असतात तर हि मांडलेली बाजू दुसरी बाजू आहे अस समजा स्वार्थी माणस प्रत्येक वेळी आपला फायदा पाहतात पण कोणास ठाऊक पडद्यामागे वेगळीच दुनिया असेल... कोणतेही समाजकार्य स्वार्थाने मिळालेल्या गोष्टींतून घडत नाही हे मान्य आहे पण तेच समाजकार्य करण्यामागे प्रत्येकाचा आपण कितीही नाही म्हटलं तरी स्वार्थच दडलेला असतो. हे समाजकार्य करून आपल्याला पुण्यच मिळणार आहे तर करायला काय हरकत आहे अशी भावना आपण कितीही नाकारलं तरी मनात येतेच.
देवळात लोक देवाकडे नवस मागतात आणि ते मागितलेले असतात म्हणूनच पूर्ण करतात, (देवाचा कामात फसवणूक नको देव आपल्यावरच कोपेल ह्या भावनेने) पण जर आपल्या आयुष्यात न मागताच काही सुंदर मनासारख्या गोष्टी घडल्या तर आपल्या येते का त्यावेळी देवाची आठवण..? तेव्हा आपण देवाला अभिनंदन किंवा आभार व्यक्त करतो का..? प्रत्येक जण स्वतःच आयुष्य एकाच नजरेने बघून जगात असतो पण त्याची दुसरी बाजू कितीहि कटू, खडतर दिसणारी असली पण मार्गावर आल्यावर सुंदर आणि नवीन नवीन विचार करायला लावणारी असते हे आपण लक्षातच घेत नाही.. आयुष्याकडून मागण्यापेक्षा आयुष्याला तुम्ही काहीतरी द्या, ते सार्थकी करा... 
दिवस येईल तसा जगावा हे वाक्य बोलणार्यांना माझे कोटी प्रणाम ../\.. दिवस येईल तसाच जगावा माणसाने पण आलेल्या दिवसाला सुद्धा एक काल आणि उद्या जोडलेले असतात ह्याच भान ठेवाव  
बाकी हम जियेंगे भी आपनी मार्झी से और मरेंगे भी आपनी मर्झी से...

(वरील मांडलेली बाजू हि नाण्याची दुसरी बाजू आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे आणि हे सर्वस्वी माझे विचार आहेत,ज्यांना पटतील त्यांनी घ्या ज्यांना नाही पटणार त्यांनी स्क्रोल करा)

Durga Vanjare

0 comments: