Coffee Solves Everything

Coffee Solves Everything
    इशा आणि अश्विनी यांच्यासारखी मैत्री आपलीही असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. एकत्र मजा करता येते, करता येतात आणि मुख्य म्हणजे आपला डोंगरा एवढा वाटणारा प्रॉब्लेम झटकन सोडवता येतो. अगदी जिवाभावाची अशी ही मैत्री.
    पण कधी कधी मैत्री मधे तणाव निर्माण होतो. त्या वेळेस गोष्टी धीराने घेतल्या नाहीत तर प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. परिणामी मैत्री संपवण्याची वेळ येते. या गोष्टी खरंतर इवल्याशा आहेत. मैत्रीत तणाव निर्माण करणार्या सर्वसाधारण गोष्टी म्हणजे jealousy आणि गैरसमज. गैरसमज हे मैत्रीत फूट पाडणारं सर्वात मोठं कारण.
    आपल्याला समोरच्या व्यक्तीची एखादी गोष्ट खटकते किंवा काही वेळेस मैत्रीत ह्या ना त्या कारणा मुळे दुरावा निर्माण होतो. आणि अशा गोष्टींची जणू यादीच तयार होऊ लागते. सुरवातीस, त्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून आपण काही बोलत नाही, आणि नंतर या गोष्टींची जागा EGO ने घेर ली जाते. " तिने मला दोन दिवस झाले केला नाही, मग मी का करू? ", " मी तर त्याला मेसेज पाठवला होता, त्याचाच आला नाही " किंवा " काल आम्ही बोलत होतो तर तिने मधेच फोन कट केला, ह्याला काही अर्थ आहे का? " असे EGO दर्शक विचार मनात येतात, त्या विचारांना वाटा फुटल्या की मग त्यांना आवरणं अशक्य. अशा वेळेस आपण पुढाकार घेणे केव्हाही उत्तम! त्या व्यक्ती विषयी उगाच तर्क लढवण्या पेक्षा, भेटून, मोकळेपणाने बोलून प्रश्न सुटू शकतात, आणि असं केल्याने मैत्री आणखी घट्ट होते (अनुभव आहे).
     असं म्हणतात ना की बोलण्याने प्रश्न सुटतात, किंवा इंग्रजीत ‘A Cup of Coffee Solves Everything’ तसंच काहीसं.. मैत्रीत काही काळाने दुरावा निर्माण होणारच, त्याला positively घ्यायचं की negatively हे तुमचं तुम्ही ठरवायचं.
     आणखी काय, कॉफी आहेच सोबतीला..


Snehal Wagh

Image Credits: workisnotajob.

0 comments: