स्पृहा जोशी

Spruha Joshi

स्पृहा जोशी हार्डकोअर मुंबईची आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये तिचं बालपण गेलं असून बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिला त्यासाठी बक्षिसेही मिळाली आहेत. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा राज्य शासनाचाबालश्री 2003’ हा पुरस्कारही मिळाला होता. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली तीदे धमालया मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणामध्ये आहे.

शालेय शिक्षण झाल्यावर स्पृहाने अभिनयासाठी आणि तसेच सेलिब्रिटींसाठी प्रसिद्ध असलेल्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रुईया कॉलेजसारख्या व्यासपीठाचा वापर करून घेत तिने कॉलेज स्तरावरील अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये कॉलेजतर्फे भाग घेतला आणि त्यात यश संपादन केलं.

रुईया कॉलेजच्या मिलिंद बोकील यांच्या गाजलेल्याशाळाया कादंबरीवर आधारितगमभनया एकांकिकेमध्ये तिने साकारलेले शिरोडकर हे पात्र चांगलेच गाजलं आणि त्यामुळे तिचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. त्यानंतर तिनेयुग्मक, ‘अनन्याअशा एकांकिकांमध्ये उत्तम भूमिका साकारली आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. कॉलेजच्या काळात स्पृहाने एका वृत्तपत्रासाठी कॉलेज रिपोर्टर म्हणूनही काम केलं होतं. त्या वेळी तिने मांडलेले कॉलेज पातळीवरील विविध विषय वाखाणण्याजोगे होते. स्पृहाचाचांदणचुराहा कविता संग्रह अक्षरग्रंथ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला असून त्यासाठी तिलाकवी कुसुमाग्रजपुरस्कारही मिळाला आहे. इतकंच नाही तर अभिनयाशिवाय पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातही तिचा चतुरस्र वावर आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्याचिरायूया लघुपटातही स्पृहाने काम केलं असून गजेंद्र अहिरे यांच्या गाजलेल्यामायबापया सिनेमातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
तिला -या अर्थाने चांगला ब्रेक मिळाला तो अवधूत गुप्तेच्यामोरयाहा चित्रपटाने. त्यात तिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचं नाव घराघरांत पोहोचलं तेएका लग्नाची दुसरी गोष्टया मालिकेमुळे. आता तिला सगळे कुहू म्हणूनच ओळखतात! मुळातच सहज अभिनय करण्याचं कौशल्य असल्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय सुनील बर्वे यांच्याहर्बेरियमया नाटकाच्या संस्थेच्यालहानपण देगा देवाया नाटकातही ती काम करते आहे. तिची या नाटकातली भूमिकाही वेगळी आहे.


एकूणच स्पृहाच्या आजवरच्या करिअरचा विचार केल्यास ती केवळ अभिनेत्री नसून चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या ब्लॉगवरदेखील ती लिहिते. पुढील काळात तिच्याकडून अधिकाधिक चांगले काम होईल, अशी आशा वाटते. तिच्या रूपाने मराठीला एक अभिनेत्री तसंच लेखिका मिळाली आहे!






Credits: DivyaMarathi.com (Jun 13, 2012) शब्दांकन: प्रणव सखदेव
Tags: Spruha Joshi, Eka Mulichi Dusari Goshta, Blog, Kuhu

0 comments: