सेट भेट अनुभव



Set Bhet

नमस्कार ../\..
आज मी आणि आपल्या कुटुंबातील काही सदस्य  चा सेट वर गेलो होतो (सगळ्यांना नेणे शक्य नव्हते त्याबद्दल क्षमस्व, पण Next Time नक्की जायचय आपल्याला) तर आजच्या दिवसाबद्दल थोडसं...

सेट वर जायचाय अस मनात चाललेलं पण योग जुळून येत नव्हता, पण आज तो योग आलाच  अगदी कालपार्यंत तळ्यात-मळ्यात होत आमचं जाणं. त्यात आपले Admin Mr. राहुल साहेब पुण्याहून येणार होते, नयनाचं सुद्धा रात्री पर्यंत नक्की नाही. त्यामुळे मनात धाकधुक चालू होती की उद्या नक्की जायला मिळेल की नाही. निहार तर येणार हे माहीतच नव्हतं. राहुल ला खरच Thanks तो सकाळी पुण्याहून आला तेही दिलेल्या वेळेचा 1 hr आधी. मग दादर स्टेशन ला चुकामूक होत शेवटी भेटलो तिथून डेस्टिनेशन ला जाण्यासाठी ट्रेन आणि मग बस असा प्रवास होता, आणि फाइनली 12 ला आम्ही पोहचलो.
तिकडे गेल्यावर मोहन आगाशे सर भेटले त्यांनी खूप छान को-ऑपरेशन केल, नंतर आपला ओम दादा आला आणि खूप मस्त बोलला सगळ्यांशी.
मग सीन सुरू होता त्यामुळे शूटिंग बघत होतो, मज्जा आली तेव्हा, आणि मग फाइनली ओम दादा ने आपल्या कुटुंबाची ओळख सगळ्यांशी Officially करून दिली. विनोद सरांना सुधा आपला ग्रूप आवडला मग आमचा फोटोशूट झाल आणि मग फाइनली ज्या कामासाठी गेलो होतो ते काम... आपल्या ग्रूपच्या ब्लॉगच Inauguration!! इशा आणि ओम चा हस्ते मम म्हणत Inauguration केल.. त्यांना एकंदर सगळंच आवडल अशा प्रतिक्रिया आल्या... निखील सर आणि माझा दत्तसंग्राम दादा ह्यांना खूप खूप थॅंक्स...

**********************


काल घडलेला एक गोड प्रसंग.....
आम्ही स्पृहा ताई आणि उमेश दादा साठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन गेलो होतो, त्याचं शूट संपल आणि लंच ब्रेक झालेला तेव्हा उमेश दादा,विनोद सर अम्चाशी बोलत होते,आणि स्पृहा ताई थोड बिझी होती, त्यामुळे आम्ही उमेश दादा चे गिफ्ट त्याला दिले आणि त्यात चुकून २ स्पृहा ताईचे गिफ्ट होते, नंतर मी म्हणले कि दादा हे स्पृहा ताई च आहे तर ताई म्हणली कि अच्छा अस वेगळ वेगळ आहे का? तर उमेश दादा म्हणाला कि आपल वेगळ नाहीय सेम आहे ग.. खूप मस्त वाटल ते ऐकून....


Durga Vanjare

0 comments: