नाती !

Relatins

सगळ्या प्रकरची नाती...
असतात मुठीत धरलेल्या वाळूसारखी.
मूठ सैलावत हात उघडून धरला तर वाळू राहते जिथल्या तिथे..
मात्रा ज्या क्षणी मूठ मिटून
वाळू धरून ठेवण्यासाठी पकड घट्ट केली,
त्या क्षणी वाळू बोटांच्या फटीतून निसटू लागते.
त्यातली जराशी वाळू उरेलही
पण बरीचशी निसटुनच जाते.
नाती अशीच असतात..
ती सैल सोडली
दुसर्‍या व्यक्तीचा आदर आणि स्वातंत्र्य राखलं
तर ती अबाधित राहतात जशीच्या तशी!
पण ती घट्ट पकडली गेली,
स्वामित्वभावनेनं,
तर ती निसटून जातात आणि कायमची संपतात..


Snehal Wagh

Tags: Sand, Relations, Relation, Snehal Wagh

1 comments:

mast snehal, its heart touching yaar

Tuesday, November 19, 2013 comment-delete