Set Bhet

नमस्कार ../\..
आज मी आणि आपल्या कुटुंबातील काही सदस्य  चा सेट वर गेलो होतो (सगळ्यांना नेणे शक्य नव्हते त्याबद्दल क्षमस्व, पण Next Time नक्की जायचय आपल्याला) तर आजच्या दिवसाबद्दल थोडसं...

सेट वर जायचाय अस मनात चाललेलं पण योग जुळून येत नव्हता, पण आज तो योग आलाच  अगदी कालपार्यंत तळ्यात-मळ्यात होत आमचं जाणं. त्यात आपले Admin Mr. राहुल साहेब पुण्याहून येणार होते, नयनाचं सुद्धा रात्री पर्यंत नक्की नाही. त्यामुळे मनात धाकधुक चालू होती की उद्या नक्की जायला मिळेल की नाही. निहार तर येणार हे माहीतच नव्हतं. राहुल ला खरच Thanks तो सकाळी पुण्याहून आला तेही दिलेल्या वेळेचा 1 hr आधी. मग दादर स्टेशन ला चुकामूक होत शेवटी भेटलो तिथून डेस्टिनेशन ला जाण्यासाठी ट्रेन आणि मग बस असा प्रवास होता, आणि फाइनली 12 ला आम्ही पोहचलो.
तिकडे गेल्यावर मोहन आगाशे सर भेटले त्यांनी खूप छान को-ऑपरेशन केल, नंतर आपला ओम दादा आला आणि खूप मस्त बोलला सगळ्यांशी.
मग सीन सुरू होता त्यामुळे शूटिंग बघत होतो, मज्जा आली तेव्हा, आणि मग फाइनली ओम दादा ने आपल्या कुटुंबाची ओळख सगळ्यांशी Officially करून दिली. विनोद सरांना सुधा आपला ग्रूप आवडला मग आमचा फोटोशूट झाल आणि मग फाइनली ज्या कामासाठी गेलो होतो ते काम... आपल्या ग्रूपच्या ब्लॉगच Inauguration!! इशा आणि ओम चा हस्ते मम म्हणत Inauguration केल.. त्यांना एकंदर सगळंच आवडल अशा प्रतिक्रिया आल्या... निखील सर आणि माझा दत्तसंग्राम दादा ह्यांना खूप खूप थॅंक्स...

**********************


काल घडलेला एक गोड प्रसंग.....
आम्ही स्पृहा ताई आणि उमेश दादा साठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन गेलो होतो, त्याचं शूट संपल आणि लंच ब्रेक झालेला तेव्हा उमेश दादा,विनोद सर अम्चाशी बोलत होते,आणि स्पृहा ताई थोड बिझी होती, त्यामुळे आम्ही उमेश दादा चे गिफ्ट त्याला दिले आणि त्यात चुकून २ स्पृहा ताईचे गिफ्ट होते, नंतर मी म्हणले कि दादा हे स्पृहा ताई च आहे तर ताई म्हणली कि अच्छा अस वेगळ वेगळ आहे का? तर उमेश दादा म्हणाला कि आपल वेगळ नाहीय सेम आहे ग.. खूप मस्त वाटल ते ऐकून....


Durga Vanjare


कालचा एपिसोड,
आणि आजच्या एपिसोड चा पूर्वरंग पाहिल्यावर एक गोष्ट जाणवली,
आपण किती स्वार्थी असतो ना हो,
म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करत असेल आणि ते आपल्याला आवडल नाही तर आपण त्या व्यक्तीने केलेलं सगळच विस्कटून टाकतो, त्याच्यावर खेकसतो, त्याची अक्कल काढतो,
पण त्या वेळी आपण हे विसरतो कि ती व्यक्ती आपल चांगल होवो यासाठीच हे सर्व करत होती,
मान्य आहे कि त्या व्यक्तीकडून चूक झाली आहे, पण त्याने आपल्या परीने जेवढ देत येईल ते दिलच कि,
पण आपण मात्र रागाच्या भरत इतक काही बोलून जातो कि म विस्कटलेल कदाचित पुन्हा कधीच जोडू शकत नाही,
त्यावेळी आपण फक्त आपला विचार करत असतो, माझं चांगल झाल कि बस्स,
पण तुमचंच चांगल करायला गेलेली व्यक्ती मात्र कायमची बंद होते,
म त्यावेळी तुम्ही आयुष्यभर केलेली सगळी चांगली काम पण त्यांच्यासोबतच बंद होतात,
आणि त्यानंतर मात्र फक्त उरतात ती मन नसलेली शरीरं,

ओम च्या आयुष्यात अस न होवो एवढंच..


- आकाश पाटील
********************* 

कालचा एपिसोड खूप छान होता.
छान अशासाठी की ओम ने आपल्या मनातील राग जाहीर व्यक्त केला सर्वांसमोर तसा तो मनाला खूप टोचून गेला पण ओम आपल्या हक्काच्या माणसावर रागवला........
डोळ्याले पाणी थांबत नव्हते एपिसोड पाहून इतका राडलोय काल.......
खरोखर मनाला टोचेल असाच बोलला ओम पण दत्ता भोऊनि ओम ची मनस्थती ओळखली हे पाहून बरे वाटले.

बाकी मस्त होता एपिसोड......Unforgettable
- नितेश कदम 

***********************

कालच्या भागात माञ दत्ताराम भाऊ एक जबाबदार कुटुंब प्रमुख दिसले व इतर सगळे स्वत:च्या दु:खात बुडालेले..
- कांचन माने
***********************


रडवलं आजच्या Episod ने.... पण माणुस त्याच व्यक्तिवर रागवतो ज्यावर तो जिवापाड प्रेम करतो. आणि तसेच ओमचे आहे. Because He Loves Everyone....
आणि मानलं पाहिजे दत्ताराम भाऊ यांना. अश्या गंभीर वातावरणात सुद्धा ते नाराज नाही झाले. कारण ते सुद्धा माणुस आहेत आणि मनानी चांगले. त्यांनी ओमच्या मानसिकता औळखली याचं कौतुक. त्यांचा एकच Aim, ओमला त्याची ईशा मिळवून देणे.
- कार्तिक गव्हाळे

Aapla Sagla Same Aahe!आजच्या धकाधकीच्या गुंतागुंतीच्या जीवनात घरच्यांशी फार बोलणारी मुलं असतात. पार्ट्या कॅरणारी टेक्नालोजिच्या विळख्यात गुंतलेली अशी संस्कार नसलेली ही मुलं असा शेरा सर्रास मारला जात होता. आजच्या मुलांना केवळ हॉलीवुड नाहीतर थ्रिलर रिॅलिटी शो आवडतात. ते त्यात रमतात आणि त्या पोरांना अभिजात कला आणि मनोरंजनातलं काही कळत नाही अस म्हणत होते टीकाकार.
हे सर्व खोटं करून दाखवलं हल्लीच्या मराठी मालिकांनी. मराठी मालिका म्हणजे केवळ सासू-सुनाचि भांडणं आणि एस्टेट साठी झगडणारे एकाच कुटुंबातील माणसे हे चित्र बदललं. ते हळूवार नाजूक प्रेम कहाणी वादविवाद नसलेली नात्यांचा गोडवा जपणर्या मालिकांनी त्यांनी युवा पिढीला मोहित केल. आता त्यांना प्रेक्षक आणि चाहते ते सुद्धा दर्दि मिळणारच होते.
आजकाल चांगलं बघायला मिळत नाही हा समज खोटा ठरला आणि अशा मालिका यशस्वी झाल्या. या साखळीतील नवी मालिका एका लग्नाची तिसरी गोष्ट, खरोखर घर आपल्या माणसांनी बनत.. काय सुंदर Tagline आहे ना!


खरच हे घर आपल्या माणसांनी बनतय. इकडे दिखाऊपणा नाही. गरजे एवढा गोडवा आहे. उगाच खोटी नाटकं रूसवेफुगावे नाहीत. आजच्या प्रॅक्टिकल जगात अगदी पर्फेक्ट अड्जस्ट होणार हे कुटुंब आहे आणि अगदी त्याच कुटुंबाप्रमाणे हे आपलं कुटुंब तयार होतय. छोट्याश्या रोपाचं हळूहळू मोठं झाड झालं आहे. आणि हे सर्व आहे ते सर्वांच्या प्रेम विश्वास आपुलकी आणि आपलेपणा मुळे ही नात्यांचा ठेवा जपणारी शिदोरी आपल्याला मिळतेय ती साठवायची आहे आणि वाढवायची पण आहे थोडक्यात समाधान न मानता आपल्याला अजुन बरंच करायचंय. या कुटुंबात महाराष्ट्रातील सर्वच आणि जगभरातून सुद्धा सहभागी होतायत सर्वांचं स्वागत आहे. अंधानुकरण करू नका आणि गैरसमज पण. या नात्यांच्या बंधनात अडकताय तर फॅक्ट एकाच लक्षात ठेवा की प्रेम विशवास आणि आपलेपणा याहून काही मोठा नाही, कारण घर आपल्या घर आपल्या माणसांनी बनत. आणि आपलं तर already सेम आहे.

Shantesh Nadkarni



(शब्दांकन : स्नेहल वाघ)
Tags: Shantesh Nadkarni, Aapla Sagla Same Aahe, Eka Lagnachi Tisari Goshta
Love-Prem

पहायला गेलं तर दोन अक्षरी शब्द आहे प्रेम
अर्थ म्हणला तर सोपा,सहज ; म्हणला तर अवघड ,गूढ…
प्रत्येकाला करावंसं वाटणारं हे प्रेम
कोणावर तरी मनापासून करावंसं वाटणारं हे प्रेम
तितकंच ते आपल्याला मिळावं असा हे प्रेम
अन् काही जणांना करता येतं आणि काहींना येत नाही!
येत नाही म्हणण्या पेक्षा व्यक्त करता येत नाही असं हे प्रेम!
प्रत्येकाला माणसं नाही पण प्रेमाची माणसं भेटाविशी वाटतात असं हे प्रेम.
ज्यांना भेटतात ती नशिबवान असतात असा हे प्रेम!
प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं हे प्रेम.
ह्याशिवाय जगणं ही अशक्य, असा हे प्रेम!
ज्या दोन शब्दाने किती अर्थ आला आहे जीवनाला ते "प्रेम"
नात्यांना मध्ये तर आपल्याला हवा असतं ते फक्त आणि फक्त प्रेम
मग जर फक्त प्रेमच हवा असतं आपल्याला नात्यात तर का गुंततो आपण सख्खा, मावस, चुलत करण्यात?
आपल्यात प्रेमाचं नातं आहे हे पुरेसं आहे ना या जगात,


म्हणूनच आहे त्या प्रेमाच्या नात्यात राहुया ना सुखात आणि आनंदात!

Renuka Mujumdar


The story revolves around lovers Om & Isha who want to get married. Isha comes from a closely knit joint family and they are looking for an ideal match for her. When she tells them about Om they agree to the alliance on one condition, “the boy should come from a loving joint family like theirs”.

But as fate would have it all can’t be perfect. Om comes from a broken family. His home is not made up of a typical family comprising of parents, grandparents, brothers & sisters. Instead his home hosts very different, unrelated individuals who are brought together by fate and Om’s generosity.
Will Om & Spruha find a family of their own, will they get the love they deserve? The show is a journey of this beautiful creation.

Featuring an enviable ensemble cast, it marks the return of the endearing Shubha Kote to the small screen along with Spruha Joshi, Umesh Kamat, Mohan Agashe, Mohan Joshi & Shubhangi Gokhale.

This is a daily show and you can watch it Mon - Sat at 9pm on Zee Marathi. We are eager to know your reaction for Eka lagnachi Teesri Goshta.


Credits: India.com (October 16, 2013, 12:06)
Tags: Spruha Joshi, Umesh Kamat, Eka lagnachi Teesri Goshta