प्रेम
पहायला गेलं तर
दोन अक्षरी शब्द
आहे प्रेम
अर्थ म्हणला तर सोपा,सहज ; म्हणला तर
अवघड ,गूढ…
प्रत्येकाला
करावंसं वाटणारं हे प्रेम
कोणावर तरी मनापासून
करावंसं वाटणारं हे प्रेम
तितकंच ते आपल्याला
मिळावं असा हे
प्रेम
अन् काही जणांना
करता येतं आणि
काहींना येत नाही!
येत नाही म्हणण्या पेक्षा व्यक्त करता
येत नाही असं हे प्रेम!
प्रत्येकाला माणसं
नाही पण प्रेमाची माणसं भेटाविशी वाटतात असं हे प्रेम.
ज्यांना भेटतात ती नशिबवान
असतात असा हे
प्रेम!
प्रत्येकाला
हवंहवंसं वाटणारं हे प्रेम.
ह्याशिवाय जगणं ही
अशक्य, असा हे
प्रेम!
ज्या दोन शब्दाने
किती अर्थ आला
आहे जीवनाला ते "प्रेम"
नात्यांना मध्ये तर आपल्याला
हवा असतं ते
फक्त आणि फक्त
प्रेम
मग जर फक्त
प्रेमच हवा असतं
आपल्याला नात्यात तर का
गुंततो आपण सख्खा,
मावस, चुलत करण्यात?
आपल्यात प्रेमाचं नातं आहे
हे पुरेसं आहे
ना या जगात,
म्हणूनच आहे त्या
प्रेमाच्या नात्यात राहुया ना
सुखात आणि आनंदात!
0 comments:
Post a Comment