Episode Review 4th Dec'13
कालचा एपिसोड,
आणि आजच्या एपिसोड चा पूर्वरंग पाहिल्यावर एक गोष्ट जाणवली,
आपण किती स्वार्थी असतो ना हो,
म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करत असेल आणि ते आपल्याला आवडल नाही तर आपण त्या व्यक्तीने केलेलं सगळच विस्कटून टाकतो, त्याच्यावर खेकसतो, त्याची अक्कल काढतो,
पण त्या वेळी आपण हे विसरतो कि ती व्यक्ती आपल चांगल होवो यासाठीच हे सर्व करत होती,
मान्य आहे कि त्या व्यक्तीकडून चूक झाली आहे, पण त्याने आपल्या परीने जेवढ देत येईल ते दिलच कि,
पण आपण मात्र रागाच्या भरत इतक काही बोलून जातो कि मग विस्कटलेल कदाचित पुन्हा कधीच जोडू शकत नाही,
त्यावेळी आपण फक्त आपला विचार करत असतो, माझं चांगल झाल कि बस्स,
पण तुमचंच चांगल करायला गेलेली व्यक्ती मात्र कायमची बंद होते,
म त्यावेळी तुम्ही आयुष्यभर केलेली सगळी चांगली काम पण त्यांच्यासोबतच बंद होतात,
आणि त्यानंतर मात्र फक्त उरतात ती मन नसलेली शरीरं,
ओम च्या आयुष्यात अस न होवो एवढंच..
- आकाश पाटील
*********************
कालचा एपिसोड खूप छान होता.
डोळ्यातले पाणी थांबत नव्हते एपिसोड पाहून इतका राडलोय काल.......
खरोखर मनाला टोचेल असाच बोलला ओम पण दत्ता भोऊनि ओम ची मनस्थती ओळखली हे पाहून बरे वाटले.
बाकी मस्त होता एपिसोड......Unforgettable
- नितेश कदम
***********************
कालच्या भागात माञ दत्ताराम भाऊ एक जबाबदार कुटुंब प्रमुख दिसले व इतर सगळे स्वत:च्या दु:खात बुडालेले..
- कांचन माने
***********************
रडवलं आजच्या Episod ने.... पण माणुस त्याच व्यक्तिवर रागवतो ज्यावर तो जिवापाड प्रेम करतो. आणि तसेच ओमचे आहे. Because He Loves Everyone....
आणि मानलं पाहिजे दत्ताराम भाऊ यांना. अश्या गंभीर वातावरणात सुद्धा ते नाराज नाही झाले. कारण ते सुद्धा माणुस आहेत आणि मनानी चांगले. त्यांनी ओमच्या मानसिकता औळखली याचं कौतुक. त्यांचा एकच Aim, ओमला त्याची ईशा मिळवून देणे.
- कार्तिक गव्हाळे
0 comments:
Post a Comment