Eka Lagnachi Tisari Goshta


"काय ह्या ईशाचे नखरे?? आईवर ओरडायला काय झालाय हिला?? त्या बिचारीला काय माहित?? जर एकांत हवा होता तर घरी यायचंच कशाला?? Change it!! .. दुसरं काहीतरी लाव..,"
- माझे पप्पा (कालचा ELTG चा एपिसोड पाहताना)

खरच आपली generation आहेच थोडी short -tempered. जरा काही मनासारख नाही झालं, कि घ्यायचं घर डोक्यावर, आकांडतांडव करायचा, आपल्याच माणसावर ओरडायचं, हे आता घराघरात चालू आहे. कुणाचा राग आपण कुणावर काढतोय याच सुद्धा भान आजकाल आपण विसरत चाललोय. त्यावेळेला ज्याच्यावर रागावलोय त्या व्यक्तीला तर डोळ्यासमोर येवूच देत नाही, मात्र त्या व्यक्तीशी related इतरांवरही आपण आपला राग दर्शवतो. 
तसं बघायाला गेल तर थोड बोलून, आपापली बाजू मांडून, विचार विनिमय करून जे पण काही वाद किंवा गैरसमज असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आजकाल जो सगळ्यामध्ये ठासून भरलाय असा स्वाभिमानरुपी EGO(!) आपल्याला हे सगळ करू देतंच नाही. त्याच म्हणन असत कि मीच का म्हणून माघार घेवू, मीच का म्हणून सगळ सहन करू, माझ्याच बद्दल अस सगळ का घडतंय आणि इतर ROFL टाईपचे नाना प्रश्न. पण आपल्या EGO मुळे आपली माणस पण दुखावली जात आहेत हे मात्र त्यावेळेस आपण विसरतो.
काहीजानासोबत discussion केल्यावर मला अस लक्षात आल कि, हे सगळ भीतीमुळे पण होत कधीकधी. एका प्रकारची insecurity निर्माण होते मनात आणि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर हक्क गाजवायला लागतो , पण त्यावेळी त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे आपण लक्षात नाही घेत. ती व्यक्ती पण दुखावलेली असेल, त्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा असतील, त्याला पण स्वतःचे काही problems असतील.
जरा विचार करा, तुम्ही एखाद्याला जेंव्हा I Love You म्हणताय, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसह आपल्या हृदयात स्थान देताय, मग तुम्ही त्याची एखादी चूक सुद्धा समजून नाही घेवू शकत?? काय नेमक आहे हे तरी कमीतकमी जाणून घ्या कि राव, अस तडकाफडकी नाती तोडून, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण लाथाडून, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पण वागणार नाही अस त्याच्याशी वागण बर वाटत का?? 
आणि नंतर आपली चूक लक्षात आली कि मग sorry sorry चे msgs करायला परत आपण तयार, म्हणजे व्यक्ती आपल खेळण आहे, जेंव्हा वाटेल तेव्हा छातीशी कावटाळाव नको तेंव्हा फेकून द्याव. हि कसली पद्धत??
प्रत्येकाला स्वतःच स्थान आहे, प्रत्येक जन स्वतःच्या जागी योग्य आणि बरोबर आहे, प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, आहेतच, त्याचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे, पण म्हणून त्याने कसंही वागण योग्य नाही. कारण आपल्याला लोकांमध्येच राहायचं आहे, म्हणून त्यांच्याशी जुळवून घेण सुद्धा आपल कर्तव्य आहे.
nw grow up!! आपण लहान तर नाही न आता. वाद झालेच तर जरा डोक शांत ठेवा, समोरच्याचं ऐकून घ्या. कोणाच ऐकून घेतलं म्हणजे तुम्ही लहान व्हाल अस काही नाही. पण त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटतय ते करा. after all तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक. 

( हा फक्त माझा स्वतःचा विचार आहे. आवडल तर घ्या नाही तर next please करा.)

Eka Lagnachi Tisari Goshta


आजचा episode देखील एखाद्या वास्तविक जीवनातील तंटा ज्याप्रमाणे माणसाच्या मनात काहीकाळ का होईना समोरच्या व्यक्तीबद्दल प्रचंड क्रोध निर्माण करून त्या व्यक्तीसाठी मनाचे सर्व दालन बंद करून टाकतो आणि कशाप्रकारे लहान सहान गोष्टी ही त्याच्या अंगाचा तिळपापड करतात याचं क्लेशदायक अनुभव करून देणारा होता. मित्रांनो आपल्या लाडक्या ELTG ला आलेले हे विरहाचे वळण खऱ्या अर्थाने मालिकेच्या नावाला सार्थ करण्याच्या हेतूने आता पुढचे पल्ले गाठणार आहे याचं हे तणावपूर्ण वातावरण संकेत देत आहे बहुधा !!! हीच आहे एका लग्नाची 'तिसरी' गोष्ट !!! मित्रांनो twitter वर दोन दिवसांपूर्वीच या संकेताची चाहूल ELTG च्या एका प्रेक्षकाला लागली होती. हुकुमतसिंग राजपूत नामक प्रेक्षकाने twitter च्या माध्यमाने स्पृहाला या संकेताची विचारणा केली आणि त्याचा अंदाज खरा ठरतोय. By the way, आजच्या अल्प वेळेत play केलेल्या background score ने मला ELDG ची आठवण करून दिली. पुढच्या भागाची झलक पाहता इशाच्या मनावर दाटून आलेले दुःखाचे आणि संतापाचे काळे ढग एवढ्यात तरी सरणार नाहीत अशीच चिन्हे आहेत. मालिकेला आलेले हे वळण आपली उत्कंठा ताणण्यात यशस्वी झाले आहे यात तिळमात्र शंका नाही!!!!
- निलेश बोऱ्हाडे
*************************

Kay yaar!!!yar ata baghavat nahiye!! Kadhi sampanar re he!!radatana baghavat nahi tila ata...!!
- चैतन्य साठे

Eka Lagnachi Tisari Goshta

काय मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड? मी पण काय प्रश्न विचारलाय.... हे म्हणजे दाराच्या फटीत बोट अडकलेल्या माणसाला विचारण्यासारख आहे की काय रे बाबा दुखतंय का? सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मला ही तुमच्या इतकच वाईट वाटतंय. पण एक विलक्षण अनुभव आला का तुम्हाला? प्रेक्षकाच्या मनात दुःखाची एक मोठी त्सुनामिरूपी लाट निर्माण करून त्या लाटेच्या गर्तेत आपण झोकले गेलो आहोत असा भास निर्माण करून देणारा कलाकार कोणत्या ताकदीचा असावा? याची तुलना माझ्या मते त्या शब्दफेक आणि कथावर्णन यावर निर्विवाद प्रभुत्व असलेल्या कथाकाराशी करता येईल जो केवळ आपल्या सशक्त वाणीने तत्क्षणी कथेत होणाऱ्या रोमांचीत क्षणांची वातावरण निर्मिती करण्याची अद्भुत कला अंगी बाळगतो. आज पर्यंतच्या स्पृहाने सादर केलेल्या तिच्या अभिनयाच्या विविध छटा पाहता आजचा तिचा अभिनय हा तिच्यामधल्या कलेच्या पूर्णत्वाचा साक्षात्कार घडविणारा होता. स्पृहा जोशी हे नाव येत्या काळात घवघवीत यश आणि लोकप्रेम संपादन केलेल्या कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसेल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. असो, स्पृहाचे गुण गाण्यासाठी आणि आकाशातील तारे मोजण्यासाठी वेळ कधीच पुरणार नाही. येणारे भाग ओमच्या आयुष्यात सुखाचे चार दिवस दाखवणारे असतील आणि परिणामाने आपल्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आणणारे असतील अशी अशा करूया....!!!!
- निलेश बोऱ्हाडे
**************************

Kay challay he!!   kahi suchatach nahiye.  Roj Roj tension vadhatay!! Lavkar sagala nit houde!! The Vadhatach challay year he sagala..
- चैतन्य साठे
**************************

Aajcha episode ne khup ragavlay mala.. Nusta flashbacks madhe ghalavla ani khupach vadavat hote.. Tech tech dakhavat hote ardha taas... Really very very embarrassing :-( :-( :-(
- अगस्ति देसाई
Eka Lagnachi Tisari Goshta

Today I'm speechless .... 
Sahsa kadhi me emotional hot nai bt aaj zalele  khupch mast hota episode ani Isha chi acting A1 hoti ani tich je vagan hot tya jagi me aste tar mihi tech kel ast so mala khupch avdlaay aajcha episode 
feeling - dont know 
- दुर्गा वंजारे
*********************

Khupach jasti tension alay! Kay yar.Kay houn basalay he sagala!
Kay honar ata. asa nako vhayla!. Shit yar...
- चैतन्य साठे
*********************

Datta bhau mhanale Sushant la HAT SOD.... Kay jabari hota avaj...
- खेताली तळेकर
*********************

कालचा एपिसोड भयंकर होता.. स्पृहा ताई काय भन्नाट अभिनय करते..
मी तर emotional झाले होते.. असं वाटत होतं की पुढचा भाग पण आत्ताच दाखवावा. होऊदे आजच जे व्हायचं ते.. Zabardast episode...
-Mixed feeling...
- स्नेहल वाघ

नवीन वर्षाचा नवीन संकल्प

नमस्कार ../\.. नूतन वर्षाभिनंदन ..... 
२०१३ आपल लाडक (काळावर प्रेम केल कि काळही लाडका होतो म्हणून लाडक) वर्ष संपल आणि आता सुरुवात झालीय ती नवीन वर्षाची, त्यासोबतच आपण या वर्षी नवीन संकल्प करून सुरुवात करणार आहोत ती एका नवीन कार्याची   
भाताच्या एका शिताने कोणाचेही पोट भरत नाही पण तेच एका मुठभर तांदळाचा भाताने नक्की भरते  आपणही तसाच काहीस करणार आहोत, आपल्या कुटुंबात प्रत्येक जण सक्रिय आहे... आपण (ज्यांना शक्य आहे ते) या महिन्यापासून आपल्या कुटुंबासाठी काही रक्कम बाजूला सारून ठेवणार आहोत. म्हणजे असे कि प्रत्येक महिन्याला ग्रुप चा नवे ठराविक रक्कम तुम्ही बाजूला सरायची.. आणि दर ६-६ महिन्यांनी ती रक्कम आपण एखाद्या अनाथ आश्रमाला सुपूर्द करायची, आम्ही शक्य तेवढ लवकर बँकेचा पर्याय उपलब्ध करू तोवर ती रक्कम तुमचा जवळच राहील  त्याची इत्यंभूत माहिती आम्ही update करतच राहू. आणि तुमचे पैसे कुठेही वायफळ खर्च होणार नाहीत हि जबाबदारी admin ची असेल 
तर मग तुम्ही सुद्धा मदत करणार ना आपल्या कार्याला..
आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा!!!

Durga Vanjare





Tags: Durga Vanjare, New Year Resolution, Bye Bye 2013, Welcome 2014, Orphanage