EPISODE REVIEW 3RD JAN'14
आजचा episode देखील एखाद्या वास्तविक जीवनातील तंटा ज्याप्रमाणे माणसाच्या मनात काहीकाळ का होईना समोरच्या व्यक्तीबद्दल प्रचंड क्रोध निर्माण करून त्या व्यक्तीसाठी मनाचे सर्व दालन बंद करून टाकतो आणि कशाप्रकारे लहान सहान गोष्टी ही त्याच्या अंगाचा तिळपापड करतात याचं क्लेशदायक अनुभव करून देणारा होता. मित्रांनो आपल्या लाडक्या ELTG ला आलेले हे विरहाचे वळण खऱ्या अर्थाने मालिकेच्या नावाला सार्थ करण्याच्या हेतूने आता पुढचे पल्ले गाठणार आहे याचं हे तणावपूर्ण वातावरण संकेत देत आहे बहुधा !!! हीच आहे एका लग्नाची 'तिसरी' गोष्ट !!! मित्रांनो twitter वर दोन दिवसांपूर्वीच या संकेताची चाहूल ELTG च्या एका प्रेक्षकाला लागली होती. हुकुमतसिंग राजपूत नामक प्रेक्षकाने twitter च्या माध्यमाने स्पृहाला या संकेताची विचारणा केली आणि त्याचा अंदाज खरा ठरतोय. By the way, आजच्या अल्प वेळेत play केलेल्या background score ने मला ELDG ची आठवण करून दिली. पुढच्या भागाची झलक पाहता इशाच्या मनावर दाटून आलेले दुःखाचे आणि संतापाचे काळे ढग एवढ्यात तरी सरणार नाहीत अशीच चिन्हे आहेत. मालिकेला आलेले हे वळण आपली उत्कंठा ताणण्यात यशस्वी झाले आहे यात तिळमात्र शंका नाही!!!!
- निलेश बोऱ्हाडे
*************************
- चैतन्य साठे
0 comments:
Post a Comment